गोरिला मार्केटिंग म्हणजे काय? - Guerrilla Marketing

Guerrilla Marketing

 



गोरिला मार्केटिंग म्हणजे काय?

 

जेव्हा आपण "गोरिला मार्केटिंग" हा शब्द ऐकतो तेव्हा गनिमीकावा ह्या युद्ध पद्धतीचा विचार आपल्या डोक्यात येणे साहजिक आहे कारण ह्याच संकल्पनेवरून मार्केटिंग च्या ह्या शैली ला त्याचे नाव मिळाले आहे. जसे गनिमीकावा ह्या युद्ध पद्धतीमध्ये शत्रूला आश्चर्यचकित करून त्याच्या वर मात केली जाते तसेच गोरिला मार्केटिंगमध्ये हि 'एलिमेंट ऑफ सप्राइस' महत्वाचा आहे.

 

गोरिला मार्केटिंग म्हणजे रणनीती आणि तंत्राचा असा संच, जो अपारंपरिक पद्धतींचा द्वारे सर्जनशीलता चातुर्याचा वापर करून मार्केटिंग च्या ध्येयाची पूर्तता करतो. आणि या मार्केटिंग शैली द्वारे आपण कमीत कमी इन्व्हेस्टमेंट करून मार्केटिंग स्पेस चा पुरेपूर वापर केला जाऊ शकतो. म्हणूनच, पैशापेक्षा कल्पनेने अधिक केल्या गेलेल्या कृतींचे विपणन म्हणून गोरिला मार्केटिंग ओळखले जाते, ज्यामध्ये सर्जनशीलता आणि पारंपारिक विपणनावरील परिणाम यावर प्रभाव असतो.

 

बजेट-फ्रेंडली असल्या कारणाने गोरिला मार्केटिंग हे मार्केटिअर्स मध्ये विशेष लोकप्रिय आहे. कारण गोरिला मार्केटिंग अंमलबजावणी करणे महाग नसते. येथे खरी गुंतवणूक ही एक सर्जनशील, बौद्धिक रणनीती आहे. रोज वापराच्या वस्तूंचा आणि सार्वजनिक जागांचा या मार्केटिंग शैली साठी वापर करून लोक संखे च्या एका मोठ्या भागाला लक्ष करू शकतो.

 

या शैली च्या मार्केटिंग चा फायदा हा आहे की तो आपल्याला ब्रँडसह खेळण्याची अनुमती देतो, आकर्षक संकल्पनांचा वापर करून प्रेक्षकांच्या भावनांशी तडजोड करता येते आणि लोकांच्या प्रतिक्रिया लक्षात घेत असलेल्या कृती तयार करता येते.

 

अश्या उपयोगी मार्केटिंग शैली, गोरिला मार्केटिंग ची काही उदाहरणे जी आपणास हि शैली समजून घेण्यास मदत करतील:

 

. झेब्रा क्रॉसिंग वरील गोरिला मार्केटिंग:

 

गोरिला मार्केटिंग द्वारे मार्केटिंग करण्यासाठी नेहमीच्या जागांपैकी एक म्हणजे झेब्रा क्रॉसिंग. आपल्याकडे आवश्यक सर्जनशीलता असेल तर जमिनीवर पेंट केलेल्या रेष्या आपल्याला खेळण्यास पुष्कळ संधी देतात.

 

. गोरिला मार्केटिंगसाठी बसण्याच्या बाकांचा वापर:

 

झेब्रा क्रॉसिंग सारखेच एक अतिशय सामान्य जागा किव्हा वस्तू म्हणजे बसण्याचे सार्वजनिक बाक. हि आपल्याला गोरिला मार्केटिंग च्या रणनीती वापरून सर्जनशीलता दाखवण्याची संधी देत.

 

. बस थांबा:

 

बस थांबा हि एक अशी जागा आहे जिथे रोज हजारो च्या संखे ने लोक येतात. अश्या ठिकाणी आपण गोरिला मार्केटिंग चा वापर करून त्या हजारो प्रेक्षकांना लक्ष करू शकतो.

 

अश्या प्रकारे सार्वजनिक जागांचा वापर आपण गोरिला मार्केटिंग साठी करून अगदी बजेट-फ्रेंडली पद्धतीने आपल्या मार्केटिंग च्या ध्येयाची पूर्तता करतो.

 

थोडे नवीन जरा जुने