फिनोलेक्स आणि त्याचे संस्थापक छाब्रिया बंधूंची यशोगाधा.

 

finolex pipes




कृषिउद्योग प्रमुख उत्पादन असलेल्या आपल्या देशात, सिंचन व्यवस्थेसाठी वापरल्या जाणाऱ्या पाईप्स मधील एक प्रसिद्ध नाव म्हणजे फिनोलेक्स. हा एक असा ब्रँड  आहे ज्याने महाराष्ट्रातील अनेक दुष्काळी भागातील शेतकरणाऱ्यांना पाणी पुरवले. सायकल वरून सुरु झालेल्या फिनोलेक्स च्या ह्या व्यवसायाने आज परदेशात सुद्धा नाव कमावले आहे.


चला जाणून घेऊयात फिनोलेक्स आणि त्याचे संस्थापक छाब्रिया बंधूंची यशोगाधा.

अमाप संपत्ती, खाण्यापिण्याची चंगळ, काम करण्यासाठी हाताखाली नोकर चाकर अश्या सर्व सुखसुविधा असलेल्या कुटुंबात प्रल्हाद आणि किशन यांचा जन्म झाला. छाब्रिया कुटुंब पाकिस्तानमध्ये असलेल्या कराची जवळ एक शिकारपूर नावाच्या गावामध्ये राहायचे. पण संकटकाळ सांगूत येत नाही . त्यांच्या वडिलांचा काही कारणास्तव अकस्मात निधन झाला आणि वडिलांच्या भाऊबंदांनी होती ती संपत्ती लुबाडून घेतली.

अश्या प्रकारे १२ वर्षीय प्रल्हाद यांच्या वर आपली विधवा आई आणि भावंडं यांची जबाबदारी येऊन पडली. त्यामुळे त्यांनी आपल्याकडे चाकर असलेल्या आणि आता कपड्याच दुकान असलेल्या माणसाकडे नोकरी करायला सुरवात केली. यातून त्यांना दर महा १० रुपये असा पगार मिळू लागला.
 
भारताच्या स्वातंत्र्यानंतर जुलै १९४५ मध्ये प्रल्हाद छाब्रिया हा भाऊ किशन यांच्यासह रोजीरोटीच्या शोधात कराचीहून पुण्यात आला. त्याने पुण्यामध्ये एका सावकाराच्या कडे घरकाम करण्यास सुरवात केली आणि यातून मिळालेले काही पैसे ते कराचीला आपल्या घरी आईला पाठवत.
     
काही काळातच फाळणी नंतर संपूर्ण छाब्रिया कुटूंब कराचीहून पुण्याला शिफ्ट झालं आणि दोन लहोळांच्या घरात छाब्रिया कुटुंबाचा संसार सुरु झाला. स्वतःकडे व्यवहारज्ञान सोडून काहीही शिक्षण नसल्या मुळे कुटुंबाच्या रोजीरोटी साठी व्यवसाय सुरु करायचं ठरलं. आणि सहा महिन्यांतच इलेक्ट्रिकल केबल्सचे विक्री करणारे छोटे दुकान उभे केले. किरकोळ व्यवसाय बर्यापैकी यशस्वी झाला. वयाच्या १७ व्या वर्षी प्रल्हाद अख्ख पुणे रोज सायकलवर फिरून धंदा केला. ते मुंबईवरून माल आणायचे आणि पुण्यात विकायचे.


दुकानात आलेली विविध इलेक्ट्रिक उपकरणे उघडणे व त्यातील वायरी दुरुस्त करणे याच अनुभवातून  किशन छाब्रिया केबल फॅब्रिकेशन शिकले. १९५० च्या दशकाच्या ट्रक आणि टँक यांच्या वायर हार्नेससाठी संरक्षण विभागाच्या एका महत्त्वपूर्ण ऑर्डरमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी स्वतः केबल्स बनवण्याचा निर्णय घेतला. हि मागणी पूर्ण कारण्यासाठी त्यांनी जपान वरून कॉपर ब्रेडेड मशिन मागवून घेतलं आणि पुण्यात एका गोठ्यात ते बसवलंकिशन छाब्रिया यांनी रिव्हर्स इंजिनिअरिंगच्या माध्यमातून  केबल बनवून  १ लाखाचे प्रॉफिट कमवले.

१९५४ साली छाब्रिया बंधूनी स्वतःची कंपनी चालू करायचे ठरवले. छाब्रिया यांच्या केबल ला फाईन आणि फ्लेक्सिबल असे वैशिष्ट्य होते. यातूनच फिनोलेक्स हे नाव उदयास आले. आणि त्यांनी त्यांचा कंपनीचे नाव फिनोलेक्स असे ठेवले. १९ मध्ये छोट्या-प्रमाणात औद्योगिक युनिट म्हणून त्यांनी ऑटोमोबाईल उद्योगासाठी पीव्हीसी इन्सुलेटेड केबल्सची निर्मिती केली.

वाढीसाठी  त्यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे त्यांनी काही कठीण काळ पाहिले पण तरीही १९७२ मध्ये हा उद्योग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत बदलला. त्यांच्या अथक वाढीसाठी १९८१ मध्ये बंधूंनी फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड (एफआयएल) ची स्थापना केली.

महाराष्ट्र मधील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काही करता यावं आणि त्यासोबतच आपला बिजनेसदेखील वाढवावा या विचारातून छाब्रिया यांनी पीव्हीसी पाईपेच्या बिझनेस मध्ये उडी घेतली.आणि कंपनीने पुणे येथे रिगिड पीव्हीसी पाईप्स आणि फिटिंग्ज बनवण्याचा निश्चय केला, ज्याचा कृषी क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात वापर आढळतो. त्यानंतर, मागे वळून ना पाहता आणि ग्राहकांच्या कोणत्याही मागण्यांकडे दुर्लक्ष करता, फिनोलेक्स केबल्स लिमिटेडने सतत विस्तार आणि आधुनिकीकरणाची प्रक्रिया सुरू केली ज्यामुळे जुलै १९८३ मध्ये ते देशातील सर्वात वैविध्यपूर्ण आणि सर्वात मोठे केबल निर्माता बनू शकले.

आज भारताच्या अगदी दुर्गम क्षेत्रातही शेती पर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी फिनोलेक्स च्या पीव्हीसी पाईप्स चा वापर होतो. फिनोलेक्स आपला व्यवसाय वाढवून फक्त फक्त पैसे कमावले नाहीत तर मुकुल-माधव फाउंडेशन आणि होप फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्य सुद्धा केले.      

आज फिनोलेक्स ऑप्टिकल केबल पासून ते स्विच गियर, पंखे, इलेक्ट्रिकल स्वीचेस, हिटर बनवणारी फिनोलेक्स केबल्स आणि कृषीविषयक उत्पादन करणारी फिनोलेक्स पाईप्स या दोन कंपन्यांच्या रुपात भारतीय उद्योगात आपली छाप पाडून आहे.

 

 

 

 

थोडे नवीन जरा जुने