About Us


 एखाद्या गोष्टीसाठी, मोठ्या स्वप्नांसाठी “मराठी माणूस एक येत नाही!” असं अनेकदा ऐकण्यात आलेलं म्हणूनच, हे बोलणं खोटं ठरवण्यासाठी आज आम्ही एकत्र येत आहोत.

 

व्यवसाय असेल अथवा आपल्या जगण्याचा प्रवास… रोज नवी आव्हाने, वाढती स्पर्धा आणि त्यामुळे आपली होणारी घालमेल. या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्या काही प्रश्नांवर, नव्या तंत्रज्ञानावर आणि त्यामुळे होणाऱ्या नव्या बदलांवर तसेच, व्यवसाय वाढीच्या संधीवर आपल्याशी “डिजिटल पंख” या माध्यमातून संवाद साधेल.

 

यामध्ये, आम्ही आपल्याला डिजिटल मार्केटिंग, अॅडव्हर्टायझिंग, सेल्स, वेबसाईट डिझायनिंग, ब्रँडिंग आणि ग्राफिक्स डिझायनिंग या अशा विविध क्षेत्राची माहिती देण्यासाठी तत्पर! कारण, आज प्रत्येकजण पुढे जाण्यासाठी, यशाची शिखरं सर करण्यासाठी “माहितीचा भुकेला” आहे म्हणूनच, आमचा हा प्रामाणिक प्रयत्न असेल ती आपली माहितीची भूक भागवण्याचा… आज आणि उद्याही!

 

स्वप्नाची सुरुवात…

ऑगस्ट २०१६ मध्ये संधीच्या शोधात एकत्र येणं झालेलं आणि त्यातूनच पाहिलेल्या स्वप्नांना पंख फुटले ज्यातून “डिजिटल पंख” उदयास आले.

 

आपल्या माणसांसाठी काहीतरी करावं जेणेकरून यशाची शिखरं सर्वांसोबत सर करावी आणि त्याचा होणार आनंद द्विगुणित व्हावा हीच आम्हा सर्वांचीच इच्छा.

 

स्वप्नाच्या दिशेने पहिलं पाऊल…

सप्टेंबर २०१८, तेच स्वप्न आणि त्याच गोष्टी सोबत घेऊन सुरुवात केली आहे प्रवासाची जिथं आहेत मोठी आव्हाने, अडी-अडचणी आणि काही करून दाखविण्याची जिद्द म्हणूनच, आज त्या स्वप्नांच्या दिशेने पाहिलं पाऊल टाकताना विश्वास आहे कि, उद्याचा दिवस आपल्या सर्वांचाच असणार!

 

Vision:  

आपल्या प्रगतीसाठी आपल्या भाषेत, आपल्या शब्दांत व्यवसाय आणि डिजिटल मार्केटिंगची माहिती उपलब्ध करून देणे.

 

Mission: 

प्रत्येक मराठी माणसाला या बदलत्या आणि स्पर्धेच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानासोबत विश्वासाचा हात देत पुढे घेऊन जाण्याचं एक ध्येय.

 

Our Team:

मनोज चंदनशिवे

(एम.बी.ए. मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग एक्स्पर्ट)

 

अजित लोखंडे

(बी.ई. , बिझिनेस स्ट्रॅटेजिस्ट)

 

अभिषेक तुम्मा

(ग्राफिक डिझायनर)