चीकी चंक - छत्र्यांची विकी करून लाखो रुपया कमवतो - Cheeky Chunk

Cheeky Chunk


उल्लेखनीय गोष्टी, जरी त्या छोट्या जरी असल्या, त्यांना श्रमाची जोड मिळाली की यश मिळतेच. याचेच बहूमुल्य उदाहरण म्हणजे प्रतीक दोषी याची सक्सेस स्टोरी.

प्रसिद्ध मार्केटिंग गुरू सेठ गोडिन यांच्या Purple Cow या पुस्तकात सांगितल्या प्रमाणे काहीतरी नवीन, अद्वितीय आणि उल्लेखनीय करण्याच्या ध्येया पायी या २२ वर्षीय तरुणाने २०१४ मध्ये चीकी चंक (Cheeky Chunk) या नावाने कंपनी सुरु केली. आज हा तरुण डिजाइनर छत्र्यांची विकी करून लाखो रुपया कमवतो. चला जाणून घेऊया याचा प्रवास.

छत्र्यांचा व्यवसाय हा इतरांपेक्षा वेगळा विचार असला तरी त्याचा बाजार कमी हंगामी असल्यामुळे जोखीम असलेला होता. पण त्याने ठरवले नि धाडस केले. प्रथमतः छोट्या बाजारपेठांना टार्गेट केले तिथे छात्रांची विक्री केली. तिथे त्याला चांगला प्रतिसाद मिळाला म्हणूनच त्याने सर्वसामा भावात डिसाईनर छत्र्या तयार बनवायचे ठरवले.

प्रतीक सांगतो की, डिझायनर छत्र्या तयार करण्याचा विचार त्यांच्या मनात दोन गोष्टींमुळे आला. पहिली गोष्ट म्हणजे डिसाईनर छत्र्यांची उल्लेखनीय कल्पना जी यापूर्वी कोणीही साधली न्हवती आणि दुसरी म्हणजे नोकरी करून दुसऱ्यांसाठी काम करण्याची व्यवसायाची तीव्र इच्छा. हे आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी त्यासाठी त्याने पदव्युत्तर शिक्षणानंतर करत असलेली नोकरी सोडली.

प्रतिकला आजही सांगतो, त्याला आठवते की, त्याने जेव्हा मित्रांसमोर हा प्रस्ताव ठेवला तेव्हा तेव्हा त्यांनी त्याची खिल्ली उडवली. कारण त्या सर्वांचे म्हणणे होते की, अशा पद्धतीच्या छत्र्यांची निर्मिती करून व्यवसाय केला जाऊ शकत नाही. पण तो मागे हटला नाही...!!   त्याला त्याचे ध्येय प्राप्त करायचे होते, त्याला त्याने पाहिलेल्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवायचे होते

'प्रतीकने सुरवातीला चीकी चंकच्या नावांतर्गत प्रथमतः त्याने ५०० डिजाईन छत्र्यांची निर्मिती केली आणि त्याने आपल्या मित्रपरिवाराच्या सहाय्याने विक्री करण्यास सुरवात केली. यासाठी त्याने स्वतःच्या बचतीच्या पैशामधून लाख ३५ हजार रुपये खर्च केले. जे त्याने काॅलेजच्या दिवसात शिकवण्या घेऊन कमावले होते. या पैशांना त्याने छत्र्यांचे डिझाईन, निर्मिती आणि वेबसाईट तयार करण्यासाठी वापरले आणि त्याने त्याची कल्पना प्रत्यक्षात तर साकारली.

मात्र त्याला फार पैसे कमावता आले नाही. तरीही प्रतीकने आपली जिद्द सोडली नाही. तो काम करत राहिला आणि आज त्याच्या नोकरीच्या तुलनेत तो पावसाळ्यातील तीन महिन्याच्या कालावधीतच दोन वर्षाचा पगार कमावतो.

एक उत्तम छत्री तयार करण्यासाठी गरज असते एका हॅन्डलची, कपड्याची, फ्रेम प्रिंट आणि शिलाईची. सगळ्या वस्तू दर्जेदार असाव्यात म्हणून प्रतिक छत्रीची फ्रेम राजस्थान मधून मागवतो. या सर्व गोष्टी एकत्रित करून तो त्याचे शिवणकाम करवातो. हे वेळेवर काम पूर्ण करण्यासाठी अनेकदा त्याने आपल्या पाठीवर छत्रीला लागणारे कापड घेऊन कितीतरी किलोमीटर प्रवास केलाआजकाल, प्रतिदिन त्याला ४००पेक्षा जास्त छत्र्या तयार करण्यासाठी ऑर्डर सापडतात..

पण आता बाजारात त्यांच्या छत्र्यांची एवढी मागणी आहे कि त्यांच्या छोट्याश्या टीमला एवढ्या ऑर्डर्स पूर्ण करणं कठीण जात आहे. कारण त्याच्या टीममधील सदस्यच छत्र्यांची पॅकिंग, दर्जा तपासणी, आर्थिक व्यवहार ही सर्व कामे पाहतात. "चिकी चुंक" या टीममध्ये सात सदस्य आहेत, ज्यांची एक छोटीसी टीम आहे.. ज्यामध्ये दोन एमबीए इंटर्न्स पण सहभागी आहे. टीम मध्ये एक अकाऊंटन्ट आणि दोन जण छत्र्यांच्या निरीक्षणाचे आणि पॅकिंगचे काम पाहतात. प्रत्येक छत्री बारकाईने तपासली जाते पावसाच्या पाण्यापासून बचाव करण्याचे प्रयत्न केले जातात. या तयारीमध्ये इतर बाबींचीही तपासणी केली जाते. ‘चीकी चंकयांच्या मार्केटिंग मध्ये फोटाेग्राफी हा महत्वाचा भाग आहे. त्यांचे म्हणणे आहे की, ५० टक्के मार्केटिंग हे आपले उत्पादन आणि ग्राहकच करत असतात. या व्यतिरिक्त -कामर्स प्लॅटफॉर्मचा वापर करण्यावरही त्यांचा अधिक जोर आहे.

आज अमेझॉन डॉटकॉमवर चिकी चुंक हा सर्वात जास्त विक्री होणारा ब्रांड तयार झाला आहे. प्रतिक सल्ला देतात की कधीही ग्राहकाला आपले उत्पादन खरेदी करण्यासाठी सांगू नका. त्यापेक्षा त्याचे लक्ष आपल्या उत्पादनाकडे कसे जाईल यावर जास्त लक्ष केंद्रित करा आणि असेच उत्पादन बनवा की लोक तुमच्या उत्पादनावर प्रेम करतील. ‘चीकी चंकचा फोकस यावरच असतो की लोक पावसात सुद्धा आनंदी राहतील. चिकी चुंक सध्या त्यांच्या वेबसाईट व्यतिरिक्त फ्लिपकॉर्ट, अमेझॉन, स्नॅपडील, आणि मुंबईच्या काही किरकोळ विक्रेत्यांमार्फत त्यांच्या उत्पादनाची विक्री करतात. या माध्यमातूनच त्यांना सर्वात जास्त मागण्या येतात.

प्रतिकचे म्हणतो, त्याला त्याच्या या व्यवसायातून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. यासाठी तो गीतेतल्या पंक्तींचे उदाहरण देतो, “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचनअर्थात तुम्ही कर्म करत रहा फळाची चिंता करू नका.


 

थोडे नवीन जरा जुने