डिमांड आणि त्याचे प्रकार - Types Of Demand

demand


'NEED', 'DEMAND' आणि 'SUPPLY', ह्या आपल्या अर्थशास्त्रांमधील काही मौल्यवान संकल्पना आहेत. आणि चौकातील सलून पासून ते कोट्यवधी रुपयांच्या पेट्रोलियम समूह अश्या प्रत्येक छोट्या, मोठ्या व्यवसायाशी ह्या संकल्पना संबंधित आहेत. त्यामुळे कोणताही व्यवसाय व त्याची वाढ ह्या तीन मूल्य संकल्पनांवर आधारित असते.
पण यामध्येही सर्वात महत्वाचं आहे ते डिमांड म्हणजेच कोणत्याही वस्तूची किव्हा सेवेची मागणी. डिमांड हि एक महत्वाची संकल्पना आहे कारण ती अर्थव्यवस्थेमधील वस्तू आणि सेवांच्या किंमतींवर थेट परिणाम करते. आणि तेच समजून घेण्यासाठी जाणून घेऊयात डिमांड आणि त्याचे प्रकार.

डिमांड ही वस्तू आणि सेवा खरेदी करण्याच्या ग्राहकांच्या इच्छेचे प्रतिनिधित्व आहे; हे एखाद्या विशिष्ट चांगल्या किंवा सेवेसाठी किंमत देण्याच्या ग्राहकाच्या इच्छेचे मोजमाप म्हणून कार्य करते. जर आपल देत असलेले उत्पादन किंव्हा सेवा याचे डिमांडच मार्केट मध्ये नसेल तर त्याचा सप्लाय करण्यात काहीच फायदा नाही.
मार्केट मध्ये कोणतेही उत्पादन व सेवा यांची डिमांड वाढी कि मार्केटमध्ये त्या वस्तूसाठी ओढातान चालू होते , ग्राहक हा दुकानदाराकडे आकर्षित होतात. हीच ओढ तयार होते डिमांड मुळे आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात.

१. Negative Demand:
निगेटिव्ह डिमांड म्हणजे अश्या गोष्य ज्या लोकांना नकोश्या आहेत पण काही कारणास्तव कराव्या लागतात. अश्या प्रकारची डिमांड हि वैयक्तिक, पारिवारिक किव्हा काही वेळा सामाजिक जबाबदारी किव्हा मजबुरी यातून उत्पन्न होऊ शकते.
ह्या मध्ये मोडतात अश्या गोष्टी व सेवा, ज्यांची लोकांना रोज गरज पडेल असे नाही, पण गरज पडली तर ते टाळू हि शकत नाहीत. याचे चांगले उदाहरण म्हणजे वैद्यकीय सेवा, विमा सेवा, किव्हा वकिलांच्या सेवा. ह्या अश्या काही सेवा आहेत ज्यांचा व्यवसाय हा नेगेटिव्ह डिमांड वर चालतो.

२. Non Existing Demand:
याचा सरळ सोपा अर्थ आहे जी डिमांड सध्याच्या मार्केट मध्ये अस्तित्वात नाही. अश्या सेवा व उत्पादने ज्यांच्याशी ग्राहक परिचित नाहीत, ग्राहकांना त्यांची गरज आहे हे माहित नाही किव्हा मुळात अश्या सेवा व उत्पादने बाजारात उपलब्द आहेत हेच माहिती नाही. त्या मुळेच याला नॉन एक्सिस्टिंग डिमांड असे संबोधले जाते.
वास्तुशास्त्रज्ञ ,भविष्यवेत्ते, ज्योतिषी अश्या सेवा ह्याच प्रकारात मोडतात. काही उत्पादने पण ह्याच प्रकारात मोडतात. त्यांचं डिमांड अस्तित्वात नसतं, ते व्यवसाय करण्यासाठी बनवावा लागतं.
३. Latent Demand:
लेटेन्ट डिमांड म्हणजे घ्रहकांची अशी मागणी जी सहजरित्या पूर्ण होऊ शकत नाही. आणि अशी डिमांड तयार होण्यामागची करणे म्हणजे योग्य उत्पादनाच्या अस्तित्वाविषयी जागरूकता नसणे; अशा उत्पादनाच्या फायद्यांबद्दल माहितीचा अभाव असणे किंवा पैशाची कमतरता असणे.
जर अश्या एखाद्या मार्केट मध्ये लेटेन्ट डिमांड असलेल्या उत्पादनं व सेवांचा अभ्यास करून आपण हे बाजारात आणले तर ग्राहक नक्कीच त्याचे स्वागत करतील. त्यावर योग्य तोडगा काढून व्यवसाय करणे योग्य ठरेल.
४. Declining demand:
प्रॉडक्ट लाइफ सायकल म्हणजेच मार्केटमध्ये असलेल्या प्रत्येक उत्पादनाच आयुष्य. विशिष्ट उत्पादनाची मागणी काही कालावधीनंतर कमी व्हायला लागते,आणि कितीही प्रयन्त केले तरी त्याची डिमांड सुधारत नाही किव्हा कमीच हिट राहते. बाजारात नावीन्यपूर्ण उत्पादनांची ओळख, पर्यायांमधील स्पर्धा, ग्राहकांची आवड बदल असे आणखी बरेच काही करणे असू शकतात ज्या मुळे विशिष्ट उत्पादनाची मागणी कमी होत राहते.
अश्या उत्पादनांना आपण rename व re-branding करून त्यांची मार्केट मधीं डिमांड पुनर्जीवित करू शकतो.

५. Irregular Demand: 
मार्केट मध्ये काही सेवा व उत्पादने अशी असतात ज्यांची मागणी हि एका ठरावीक काळापुरतीच असते, किव्हा ती काळानुसार बदलते, यालाच इर्रेग्युलर डिमांड असा म्हणतात. ह्या सेवांच्या किव्हा उत्पादनाच्या डिमांड मध्ये हंगामी, दररोज किंवा दर तासाच्या आधारावर बदलू शकतात.
पण जेव्हा ह्या सेवांच्या किव्हा उत्पादनाच्या डिमांड चा काळ येतो, जसे पावसाळ्यात छत्र्या व हिवाळ्यात स्वेटर, तेव्हा ग्राहक त्यांना जास्तीचे पैसे देऊन सुद्धा खरेदी करतात.
ह्या गोष्टी लक्षात घेऊन जर व्यवसाय केला तर नक्कीच व्यवसायायत फायदा होऊ शकतो .
 ६. Unwholesome demand:
वस्तू, सेवा आणि क्रियाकलापांची अशी मागणी जी वैयक्तिक आणि सामाजिक कल्याणासाठी कमी मानली जाते. हा देखील निगेटिव्ह डिमांडचाच एक प्रकार आहे. समाज कल्याणासाठी वेगवेगळ्या प्रकारे बंधने घालून यांची डिमांड कमी केली जाते. परंतु काही लोक असे असतात की ते या उत्पादनासाठी हव्या त्या किमती द्यायला तयार असतात.
या सेवांच्या किव्हा उत्पादनांच्या व्यवसायाला विशेष जाहिरात करायची गरज पडत नाही, कारण इथे ग्राहक हा अति उत्सुकअसतो, त्याला थोडा अनुभव दिला की तो कायमस्वरूपी ग्राहक होऊन जातो.
७. Full Demand:
मार्केट मधील एक अशी परिस्थिती जेव्हा बाजारात उत्पादनांची एकूण विक्री संख्या त्याच्या उत्पादकाच्या उत्पादनाच्या क्षमतेइतकी असते. हि परिस्तिथी म्हणजे फुल डिमांड.
आपले उत्पादन किंवा आपली सेवा ही फुल रिमांड मध्ये रहावी हेच एखाद्या व्यवसायाचं खरं स्वप्न असतं. पण त्यासाठी अश्या उत्पादनांचा पुरेपूर अभ्यास करून त्याच्या व्यवसाय केल्यास नक्कीच फायदेशील होईल.
 ८. Over full demand:
जेव्हा एखाद्या उत्पादनासाठी कंपनीची मर्यादित उत्पादन क्षमता असते तेव्हा ही मागणी निर्माण होते, परंतु त्याची मागणी उत्पादन क्षमतेपेक्षा जास्त असते. म्हणजे मागणी जास्त आहे परंतु पुरवठा कमी आहे.

 अश्या वेळी ग्राहकांच्या डिमांड जास्तीतजास्त कशी पुरवता येईल याकडे लक्ष ठेवाव लागत. 
अश्याच प्रकारे मार्केट मधील वेगवेगळ्या डिमांड्स चा अभ्यास करून आपण नवीन व्यवसाय सुरु करु शकता किव्हा असलेल्या व्यवसायाची वाढ करू शकता.
थोडे नवीन जरा जुने